भंडारा: शासनाच्या डोळ्यात धूळफेक? शेतीच नसलेल्यांना मिळाले धानाच्या बोनसचे पैसे

भंडारा: शासनाच्या डोळ्यात धूळफेक? शेतीच नसलेल्यांना मिळाले धानाच्या बोनसचे पैसे

>>सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्यात शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बोगस शेतकरी दाखवून बोनसची रक्कम उचल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील दि सहकारी संस्था पिंपळगाव यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केल्याचं बोललं जात आहे. दि सहकारी संस्था पिंपळगाव ‘अ’ गटातील धान खरेदी केंद्र आहे. 2023 – 24 हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर केला. ज्या शेतकऱ्यांनी सात बारा ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. पण पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून ऑनलाइन करण्यात आले. त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुद्धा जमा झाली. एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर 25 बोगस शेतकरी आढळून आले आहेत. या विषयी दि सहकारी संस्था यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की, हे सातबारे डाटा ऑपरेटर यांनी ऑनलाईन केले कसे केलें हे माहिती नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत.

महत्त्वाची बाब ही आहे की ज्यांच्या नावाने बोनसची रक्कम उचललेली आहे त्यांच्याकडे शेतीच नाही. मग त्यांचे सातबारे तयार झालेच कसे तलाठ्यांनी सुद्धा सातबारा दिला नाही पण डूप्लिकेत सातबारे आलेच कुठून हा संशोधनाचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे. वेगवेगळ्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावांनी पैशाची उचल झाली आहे. हा प्रकार पिंपळगाव आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड झाला असून चौकशी केली तर जिल्हाभर असा प्रकार आढळून शकतो असंही सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.

जिल्हा पणन अधिकारी यांना माहिती मिळाली पण आपल्याला कोणीही तक्रार केली नाही त्यामुळें कारवाई कशी करणार असं उत्तर त्यांनी दिलं आहे. पणन अधिकारी रजेवर असल्याने जिल्हाधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. पण शासनाच्या डोळ्यात धूळ घालून हा घोटाळा करण्यात आल्याचं बोललं जात आहे. घोटाळेबाजांना कोणाचं सहाय्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा यंत्रणेलाचा हाताशी घेऊन बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;