पवनी कोळसा खाणीमुळे साखरी गाव तलावातील माशांचा मृत्यू; घातक रासायनिक द्रव्यांमुळे घटना
पवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या बल्लारपूर कोळसा खाणीमुळे निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे गाव तलावातील हजारो माशांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील साखरी गावातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
WCL च्या बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य साखरी गावातील तलावात मिसळले. यामुळे तलावातील हजारो माशांच्या मृत्यू झाला. दूषित पाण्यामुळे हवेमध्ये घातक गॅस पसरल्याने साखरी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. WCL मुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोळसा हाताळणी करताना WCL द्वारे घातक वायू प्रदूषण केले जात आहे. घातक रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडून WCL पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत असल्याने कोळसा खाणीतील धुळीमुळे वायू प्रदूषण होत आहे. WCL च्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण परवानगी रद्द करून, WCL च्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकांवर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. WCL मुळे झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावांना योग्य नुकसान भरपाई देणे, अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List