दारू प्यायल्यानंतर माझी मुलं तर…, मुलांच्या वाईट सवयींबद्दल सलीम खान यांचं मोठं वक्तव्य

दारू प्यायल्यानंतर माझी मुलं तर…, मुलांच्या वाईट सवयींबद्दल सलीम खान यांचं मोठं वक्तव्य

स्क्रिनरायटर आणि अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांची एक मुलाखत सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. सांगायचं झालं तर सलीम खान कायम त्यांच्या मुलांच्या चांगल्या – वाईट काळात सोबत असतात.

आता सलीम खान यांची जी मुलाखत चर्चेत आहे. त्यामध्ये त्यांनी सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान यांच्या रागीट स्वभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत सलीम यांनी, ‘तुमच्यातील असा एक गुण जो तुमच्या मुलांमध्ये देखील आहे?’ यावर उत्तर देत सलीम खान म्हणाले, ‘त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवणं…’

पुढे सलीम खान म्हणाले, ‘स्वाभाव रागीट असेल तरी काही हरकत नाही. पण राग योग्य ठिकाणी दाखवता आला पाहिजे. राग अनुवांशिक समस्या आहे जी माझ्या मुलांमध्ये देखील आली आहे. पण राग कसा नियंत्रित ठेवला पाहिजे हे शिकता आलं पाहिजे. नाहीतर, चांगल्या गोष्टी देखील खराब होतात. दारु प्यायल्यानंतर काही सांगायलाच नको. दारु पिणं कंट्रोल नाही करू शकत तर, त्यांना सोडून दिलं पाहिजे..’ असं देखील सलीम खान म्हणाले.

सांगायचं झालं तर, सलमान खान याने देखील एका मुलाखतीत स्वतःच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितलं होतं. सलमान खान म्हणाला होता, ‘मला खूप जास्त राग येतो. राग म्हणजे असं नाही की, मी बाटली घेऊन कोणाच्या डोक्यात घालतो. रागात मी शॉरट टेम्पर होतो. कधी बीपीचा त्रास देखील होतो.’

‘रागात काही गोष्टी योग्य आहेत की अयोग्य तुम्हाला माहिती नसतं. तुम्हाला होणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवायचं असतं पण तसं होत नाही. हा राग आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलीम खान यांच्या मुलाखतीची चर्चा रंगली आहे.

विवेक ओबेरॉय – सलमान खान यांच्या भांडणावर काय म्हणाले सलीम खान?

सलीन खान म्हणाले होते, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;