कोरोनाने डोकेदुखी वाढवली; जगाची चिंता पुन्हा वाढली, नव्या व्हेरियंटने आरोग्यतज्ञ काळजीत
कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा जगाची चिंता वाढवली असून आरोग्य तज्ञांची डोकेदुखीही वाढली आहे. अलीकडच्या काळात कोरोनाची प्रकरणे कमी झाली असली तरी आताही त्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठे आव्हान समोर उभे ठाकणार आहे.
FLiRT हा कोविडचा नवा प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने अमेरिकेत आणि सिंगापूरमध्ये थैमान घातले असून हिंदुस्थानातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढली नव्हती, स्थिर होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या नवीन प्रकारांचा एक नवीन संच सांडपाण्यात दिसला. त्याला FLiRT असे नाव देण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List