ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बोलबाला; 49 लाख 73 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 4 जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे. मतदान संपताच तब्बल 27 तासांनंतर निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात 52.09 टक्के, कल्याण लोकसभेसाठी 50.12 भिवंडी लोकसभेसाठी 56.41 तर पालघर लोकसभेसाठी 63.91 टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत पालघरने बाजी मारली आहे. तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. चारही लोकसभा मतदारसंघांत 88 लाख 25 हजार 351 मतदारांपैकी 49 लाख 73 हजार 42 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मजबूत करण्यात हातभार लावला आहे. चारही लोकसभांमध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचा आवाज घुमेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विक्रमगडची बाजी… भाईंदरची पिछाडी
भिवंडी लोकसभेत सर्वाधिक भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ७२.६६ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी भिवंडी पूर्व मतदारसंघात ४९. ८७ टक्के मतदान झाले. कल्याण लोकसभेत डोंबिवलीत सर्वाधिक ५१.६७ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी अंबरनाथमध्ये ४७.०७ टक्के मतदान झाले. ठाणे लोकसभेत सर्वाधिक कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात ५६.२५ टक्के मतदान झाले तर सर्वांत कमी मीरा-भाईंदरमध्ये ४८.९५ टक्के मतदान झाले. पालघर लोकसभेत सर्वाधिक विक्रमगडमध्ये ७४.४५ टक्के मतदान झाले. तर नालासोपारामध्ये सर्वात कमी ५२.३४ टक्के मतदान झाले.
मतदानाची अंतिम टक्केवारी
ठाणे – ५२.०९ कल्याण ५०.१२ भिवंडी – ५६.४१ पालघर ६३.९१
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List