मतदान केंद्रावर ना पाणी ना पंखे, संथ मतदान, नावेही वगळली; ठाण्यात निवडणूक यंत्रणेचा बेजबाबदार कारभार; कठोर कारवाई करा!
यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही. अनेक ठिकाणी बोगस मतदान, तर मतदारांची नावेदेखील वगळण्यात आल्याने एकप्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा, मतदारांचा अपमान आहे. तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
ठाण्यात मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदारपणाचे दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक जण कंटाळून मतदान न करताच निघून गेले. मतदान व्हावं यासाठी विविध माध्यमातून आवाहन केले गेले. मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. निवडणूक कामात भोंगळ कारभार करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी मागणी केळकर यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List