वृद्धेची हत्या करून फरार झालेला आरोपी अटकेत
वृद्ध महिलेची हत्या करून पळून गेलेल्या बैजू मुखिया या आरोपीला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मुखिया हा बिगारी काम करतो. महिलेची हत्या केल्यानंतर तो काही अंतर अनवाणी चालत गेला होता. ते एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्यावरून पोलिसांनी तपास करून बैजूला गजाआड केले. त्याला न्यायालयाने 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मालाड पश्चिमच्या सुभाष डे चाळीत शांताबाई कुराडे राहत होत्या. गेल्या आठवडय़ात शांताबाईच्या घरात कोणतीही हालचाल झाली नव्हती. त्यामुळे स्थानिकांनी याची माहिती मालाड पोलिसांना दिली. तेव्हा शांताबाई ही मृत अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शांताबाईची हत्या झाल्याचे त्या अहवालात नमूद केले. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, तुषार सुखदेवे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने अडचणी येत होत्या. एका परिसरात पोलिसांना बैजू हा अनवाणी चालत जाताना दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली.शांताबाईची हत्या झाल्यानंतर बैजू तेथे दोन दिवस आला नव्हता. अखेर पोलिसांना बैजूची कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.
नुकसानभरपाईवरून झाला होता वाद
बैजू हा दोन महिन्यांपूर्वी शांताबाई राहत असलेल्या घरात भाडय़ाने राहत होता. बैजू हा गेल्या आठवडय़ात त्या रूममध्ये आला. तेथे शांताबाई झोपल्या होत्या. शांताबाईने तिथे 15 हजार ठेवले होते. ते पैसे बैजूला दिसले. त्याला पैशाचा मोह आवरला नाही. पैसे चोरून तो पळत होता. तेव्हा शांताबाई उठल्या. चोरी पकडली जाईल म्हणून त्याने शांताबाईची हत्या करून पळ काढला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List