इगतपुरीतील धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू; उजनी जलाशयात बोट उलटून 6 बेपत्ता

इगतपुरीतील धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू; उजनी जलाशयात बोट उलटून 6 बेपत्ता

नाशिक/इंदापूर, दि. 21 (प्रतिनिधी)

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 युवती आणि 2 युवकांचा समावेश आहे. हे सर्वजण आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडी परिसरातील राहणारे आहेत. दरम्यान, उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत सहाजण बेपत्ता आहेत.

मृतांमध्ये अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16), हनीफ अहमद शेख (24), ईकरा दिलदार खान (14) यांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

वादळी वाऱयाने उजनी धरणाच्या जलाशयामध्ये प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सहाजण बेपत्ता झाले आहेत. करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जात असताना ही घटना घडली. यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बचावले आहेत. त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;