जन्मतारखेत बदल करण्यास हायकोर्टाचा नकार; पुढच्या महिन्यात निवृत्त होणाऱया कर्मचाऱयाला चपराक

जन्मतारखेत बदल करण्यास हायकोर्टाचा नकार; पुढच्या महिन्यात निवृत्त होणाऱया कर्मचाऱयाला चपराक

जन्मतारखेत बदल करण्यासाठी महापालिका कर्मचाऱयाने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा कर्मचारी पुढील महिन्यात 30 तारखेला निवृत्त होणार आहे.

पावलास धाबाडे असे या कर्मचाऱयाचे नाव आहे. जन्मतारखेत बदल करावा, अशी विनंती त्याने पालिकेकडे केली होती. पालिकेने जन्मतारखेत बदल केला नाही. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार देत धाबाडे यांची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण

1 जून 1994 रोजी धाबाडे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यावेळी कागदोपत्री त्यांची जन्मतारीख 14 जून 1966 नोंदवण्यात आली. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 14 जून 1972 अशी नोंद आहे. त्यानुसार पालिकेच्या दफ्तरी तसा बदल करावा, अशी धाबाडे यांची मागणी होती. जन्मतारखेत दुरुस्ती करायची असल्यास कर्मचाऱयांनी सेवेत रुजू झाल्यानंतर पाच वर्षांत अर्ज करावा, असे फर्मान 2011 मध्ये पालिकेने जारी केले. महत्त्वाचे म्हणजे धाबाडे 1994 मध्ये पालिकेच्या सेवेत रुजू झाले. 2019 मध्ये पहिल्यांदा त्यांनी जन्म तारखेत दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला. सेवेत रुजू झाल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी त्यांनी हा अर्ज केला. त्यांचा अर्ज मान्य करताच येणार नाही, असा दावा पालिकेने केला. तो न्यायालयाने मान्य केला.

खोटी माहिती दिली; न्यायालयाने सुनावले

याआधीही धाबाडे यांनी जन्म तारखेत दुरुस्ती करण्यासाठी याचिका केली होती. ही याचिका मागे घेण्यात आली. नंतर पुन्हा त्यांनी याचिका केली. याआधी कोणतीही याचिका करण्यात आली नव्हती, असे धाबाडे यांनी नव्याने केलेल्या याचिकेत नमूद केले. त्यांचे हे वर्तन चुकीचे आहे, असेही न्यायालयाने सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;