दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी
या वर्षी इयता बारावीचा निकाल दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच जाहीर झाला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच निकाल तयार होता, पण लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्यामुळे निकाल मतदानानंतर जाहीर करण्यात आला.
इयत्ता दहावीचा निकालही एक आठवडा आधीच म्हणजे 27 मे रोजी अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या 24 मेपासून दहावीच्या प्रवेशाची ऑनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
दहावी, बारावीच्या दोन वेळा परीक्षा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रांमध्ये विभागून घेणे राज्य मंडळाला अडचणीचे ठरणार असल्याने मंडळाने सध्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ताळेबंद करून दोनदा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा 15 ते 20 दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला फेब्रुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List