डेक्कन चार्जर्सच्या पराक्रमाची आरसीबी पुनरावृत्ती करणार

डेक्कन चार्जर्सच्या पराक्रमाची आरसीबी पुनरावृत्ती करणार

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात नेट रनरेटच्या जोरावर ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करीत जेतेपद पटकाविण्याची किमया गेल्या 16 वर्षांत एकटय़ा डेक्कन चार्जर्सने केली आहे. या विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लाभलीय. बंगळुरूनेही नेट रनरेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले असून त्यांना ‘आयपीएल’ जेतेपद जिंपून नवा इतिहास रचता येऊ शकतो. उद्या होणाऱया लढतीत याचे स्पष्ट संकेत मिळू शकतील.

2009च्या ‘आयपीएल’ मोसमात डेक्कन चार्जर्सने नेट रनरेटच्या संघर्षात पंजाब किंग्जला मागे टाकत प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले होते. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया या संघाने अंतिम सामन्यात बंगळुरूला नमवीत जेतेपद संपादले होते. त्यानंतर फक्त 2012 आणि 2021 या मोसमात चौथ्या क्रमांकाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. 2012 साली चेन्नईने, तर 2021 साली कोलकात्याने नेट रनरेटवर चौथे स्थान मिळवीत अंतिम फेरीत धडक मारली होती. म्हणजेच गेल्या 16 मोसमांत केवळ तीनच चौथ्या क्रमांकाचे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले आहेत, मात्र या मोसमात अफलातून खेळ करणाऱया बंगळुरूकडून सर्वांना जेतेपदाच्या पराक्रमाची अपेक्षा आहे. तसेच आजवर तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही एकही आयपीएल जेतेपद बंगळुरू जिंपू शकलेला नाही. विशेष म्हणजे या तीन अंतिम सामन्यांपैकी दोन सामन्यांत हैदराबादकडून त्यांना हार सहन करावी लागली होती.

 

क्वॉलिफायरच होतात विजेते

आयपीएलच्या इतिहासात एका गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती झालीय. ती म्हणजे अव्वल दोन संघ म्हणजेच क्वॉलिफायर संघच विजेते ठरलेत. 16 पैकी तब्बल नऊ वेळा अव्वल दोन संघांमध्येच अंतिम लढत रंगली आणि त्यांनी जेतेपदही पटकाविले. या संघर्षात गुणतालिकेत पहिला असलेला संघ चार वेळा आणि दुसऱया क्रमांकाचा संघ पाच वेळा विजेता ठरलाय. चेन्नईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलीय. त्यापैकी चार वेळा ते गुणतालिकेत दुसऱया स्थानावर असताना अजिंक्य ठरलेत. गुणतालिकेत अव्वल असताना चेन्नईचा संघ कधीही विजेता ठरलेला नाही. दुसरीकडे मुंबईने तीन वेळा अव्वल स्थानासह जेतेपद पटकाविले होते. यावेळी अव्वल दोन संघच अंतिम फेरी गाठतात की नाही, ते दुसऱया क्वॉलिफायरनंतरच स्पष्ट होईल.

अजिंक्यपदासाठी दुसरे स्थान लकी

आयपीएलमध्ये दुसरे स्थान संघासाठी नेहमीच लकी ठरले आहे. दुसऱया स्थानावर असलेला संघ 16 पैकी 13 मोसमांत अंतिम फेरीत पोहोचलाय आणि आठ वेळा त्याने विजेतेपदही पटकावलेय. दुसरीकडे गुणतालिकेत अव्वल असणाऱया संघानेही 16 पैकी 12 फायनल गाठल्यात, पण त्यांना सात वेळा जेतेपदाने हुलकावणी दिलीय. म्हणजे केवळ पाच वेळा ते विजेते ठरलेत. तिसऱया क्रमांकाचा संघ दोनदा, तर चौथ्या क्रमांकाचा संघ एकदाच विजेता ठरलाय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;