पराभवाची खात्री झाल्याने भाजपने मतदान यंत्रणा बिघडवली; संजय राऊत यांचा घणाघात

पराभवाची खात्री झाल्याने भाजपने मतदान यंत्रणा बिघडवली; संजय राऊत यांचा घणाघात

भाजपला त्यांच्या पराभवाची खात्री झाल्यामुळेच त्यांनी मतदान यंत्रणा बिघडवली असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल तिथेच कासवगतीने यंत्रणा चालू होती आणि भाजपच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षांचा टक्का वाढू शकतो तिथे कोणत्याही अडचणीशिवाय मतदान घडवण्यात आले, असा थेट आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी आज संथगतीने झालेल्या मतदान प्रक्रियेवर टीका केली. मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रटेजी राबवली का अशी शंका वाटावी असे चित्र सोमवारी पाहायला मिळाले, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी जागरूक होती म्हणून भाजपला ईव्हीएम हॅक करता आले नाहीत. पैसेवाटपही आम्ही पकडले. त्यामुळेच त्यांनी यंत्रणा ढिली करून चार-चार तास लोकांना रांगेत उभे केले. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. पहाट झाली तरी चालेल, पण रांग सोडू नका असे आवाहन शिवसेनेने केल्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 11 पर्यंत मतदान होऊ शकले, असे संजय राऊत म्हणाले.

…तरीही इंडिया आघाडीच जिंकणार

मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करणे हा लोकशाही आणि निवडणुकीचा अपमान आहे असे सांगतानाच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांत अशा पद्धतीने यंत्रणा बिघडवण्यात आली. भाजपा आणि मित्रपक्षांचा सर्व ठिकाणी पराभव होणार याची खात्री झाल्यानेच हा शेवटचा डाव टाकण्यात आला. तरीही इंडिया आघाडीच जिंकणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यंत्रणा भ्रष्ट करण्यात भाजपा, मिंधे, अजित पवार माहीर

निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन यंत्रणा भ्रष्ट करण्यात भाजपा, मिंधे गट आणि अजित पवार गट माहीर आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मशालीला मतदान होण्याची शक्यता होती तिथं यंत्रणा बिघडवण्यात आली, असे सांगत संजय राऊत यांनी मुंब्रा येथे घडलेल्या प्रकाराचा दाखलाही दिला. मुंब्य्रात एका तासात केवळ अकराच मतदारांनी मतदान टाकले, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;