भगवती रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्याची माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी 

भगवती रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्याची माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी 

बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम सुरू आहे, मात्र इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रारी आल्या असून अतिरिक्त पालिकांनी पाहणी दौरा करावा आणि पंत्राटदाराला तत्काळ काळय़ा यादीत टाका, अशी मागणी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पश्चिम उपनगराच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

 पालिका रुग्णालयांत मागील काही वर्षांपासून रुग्णांचा वाढता ओघ पाहता उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार करण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. बोरिवली (पश्चिम) येथील हरिलाल भगवती (एनसीटी) महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा विस्तार करून त्या ठिकाणी मोठी इमारत बांधली जात आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना अधिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

रुग्णालयाच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या मे. पॅपासिटे ई-गवर्नन्स जे.व्ही. या पंत्राटदाराने केलेल्या कामाबाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरीही या पंत्राटदाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पंत्राटदाराला पाठीशी कोण घालत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

भगवती रुग्णालयातील काम निकृष्ट असेल तर त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पत्राची वेळीच दखल घेऊन पाहणी दौरा करावा आणि पंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकावे, अशा मागणी रवी राजा यांनी पत्राद्वारे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;