अफगाणिस्तानी गोलंदाजांना ब्राव्हो शिकवणार यॉर्पर
आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी उंचवावी म्हणून वेस्ट इंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यॉर्पर शिकवणार आहे. त्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (एसीबी) त्याची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यॉर्परचे धडे गिरवण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ सेंट किट्स अॅण्ड नेव्हिसमध्ये पोहोचला असून पुढील दहा दिवस ते ब्राव्होचे मार्गदर्शन घेणार आहे. दोनवेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱया विंडीज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया ब्राव्होने 2021 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले होते, मात्र तो आजही जगभरातील लीगमध्ये खेळतोय. याच वर्षी आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये खेळला होता आणि तो एमआय एमिरेट्स संघाचा सदस्य होता. त्याने आपल्या 573 टी-20 सामन्यांमध्ये 625 विकेट टिपल्या आहेत. तो सध्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या गोलंदाजीचा प्रशिक्षकही आहे. अफगाणी संघ 29 मे रोजी आपला पहिला सराव सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 31 मे रोजी स्का@टलंडविरुद्धही सराव सामना खेळेल. त्यांचा संघ ‘क’ गटात विंडीज, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या संघाविरुद्ध भिडणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List