संदेशखलीतील महिलांची स्थिती पाहून दुःख झाले; भाजपने कटकारस्थान रचले

संदेशखलीतील महिलांची स्थिती पाहून दुःख झाले; भाजपने कटकारस्थान रचले

संदेशखलीतील महिलांची स्थिती पाहून प्रचंड दुःख झाले. भाजपने महिलांच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. भाजपने जे कटकारस्थान रचले त्याचा आता पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बशिरहाट येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यांच्याशी पह्नवरून बोलणे झाल्याचे सांगतानाच, भाजपच्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशातील स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेषतः उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.  संदेशखलीतील महिलांसोबत जे काही झाले, त्यांना ज्याप्रकारे अपमानित करण्यात आले त्याबद्दल मी माफी मागते. त्याबद्दल मी अंतःकरणापासून दुःख व्यक्त करते, असे सांगतानाच कुणीही महिलांच्या प्रतिष्ठेशी खेळू नये अशा शब्दांत दरडावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;