अमोल आता डायरेक्ट खासदार होणार; गजानन कीर्तिकर यांचे वक्तव्य

अमोल आता डायरेक्ट खासदार होणार; गजानन कीर्तिकर यांचे वक्तव्य

अमोलला बोट धरून मी शिवसेनेत आणले. आता अमोल ना नगरसेवक, ना आमदार, तर डायरेक्ट खासदार होणार असे विधान शिंदे गटाचे खासदार गजाजन कीर्तिकर यांनी केले. इतकेच नव्हे तर, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील असेही त्यांनी सांगितले.

एका खासगी टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात बोलताना गजानन कीर्तिकर यांनी हे विधान केले. यापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टार्ंनग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो. त्यानंतर आता गजानन कीर्तिकर यांनी अमोल थेट खासदार होणार असे वक्तव्य केले आहे.

z अमोल हा उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही. त्याला जायचे असते तर त्याचवेळी आमच्यासोबत शिंदे गटात आला असता. एकनाथ शिंदे यांनी त्याला स्वतःसोबत आणायला सांगितले होते; पण त्याने आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जिंकल्यानंतरही तो उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे कीर्तिकर म्हणाले.

महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार

राज्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिले आहेत ते पाहिल्यावर महाविकास आघाडीला राज्यात चांगल्या जागा मिळतील, असे कीर्तिकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;