टिळक पुलावरील भिंडेची आठ बेकायदा होर्डिंग्ज उतरवली; महापालिकेची धडक कारवाई सुरूच

टिळक पुलावरील भिंडेची आठ बेकायदा होर्डिंग्ज उतरवली; महापालिकेची धडक कारवाई सुरूच

घाटकोपरमध्ये भावेश भिंडे याच्या इगो कंपनीने बेकायदेशीरपणे उभारलेल्या महाकाय होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही शहरातील बेकायदा होर्डिंगविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून दादरमधील टिळक पुलावरील आठ बेकायदा होर्डिंग सोमवारी रात्री उतरवली. ही सर्व होर्डिंग भावेश भिंडे याच्या इगो मीडिया कंपनीची होती.

दादरचा टिळक पूल हा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे पुलावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या महाकाय जाहिराती झळकतात. त्यामुळे या जाहिराती लोकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, घाटकोपरमधील छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने आणीबाणी कायद्याअंतर्गत मध्य व पश्चिम रेल्वेला नोटीस बजावत होर्डिंग तत्काळ हटवण्याचे आदेश दिले होते. इगो मीडियाची मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग लावण्यात आली आहेत. दादरच्या टिळक पुलावर या कंपनीची आठ बेकायदा होर्डिंग आढळली. त्यानंतर टिळक पुलावरील वाहतुकीला अडथळा न आणता महापालिकेने कारवाई केली. ही आठ हार्ंडग्ज महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील कंत्राटदाराच्या माध्यमातून काढण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

z लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ये-जा असणाऱया ठिकाणी महाकाय होर्डिंग्ज लावली जातात. आठ होर्डिंगपैकी एका फलकाची लांबी 80 आणि रुंदी 100 फूट आहे. इतर होर्डिंग 30 बाय 40 फुटांची होती.

z मुंबईत रेल्वेने आपल्या हद्दीतील एकाही जाहिरातीचे होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही तसेच या जाहिरातीसाठी मिळणारे जाहिरात शुल्कही पालिका प्रशासनाकडे भरलेले नाही.

z मुंबईत जास्तीत जास्त 40 फूट बाय 40 फूट आकाराच्या होर्डिंगना महापालिका परवानगी देते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग त्यापेक्षा मोठे आहेत, असे महापालिकेने बजावलेल्या नोटिसीत म्हटले होते.

z नोटीस बजावल्यानंतर तीन दिवसांत होर्डिंग तत्काळ हटवण्याचे आदेश पालिकेने नोटिसीत दिले होते. मंगळवारी दिवसभरात आठ होर्डिंग्जवरील जाहिराती आणि नंतर होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे काढण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;