उच्चभ्रू मतदारांची मतदानाबाबत उदासीनता; कुलाब्यात सर्वात कमी 43.68 टक्के मतदान

उच्चभ्रू मतदारांची मतदानाबाबत उदासीनता;  कुलाब्यात सर्वात कमी 43.68 टक्के मतदान

संपूर्ण राज्यात कुलाब्यातील उच्चभ्रू मतदारांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानात कमालीची उदासीनता दाखवल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कुलाबा मतदारसंघात राज्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 43.68 टक्के मतदान झाले. तेरा लोकसभा मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत एकूण 56.89 टक्के मतदान झाले.

मुंबईतील सहा मतदारसंघाबरोबरच राज्यातील एकूण 13 मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान पार पडले. मतदानानंतर मंगळवारी रात्री अंतिम आकडेवारी जाहीर झाली.

या आकडेवारीनुसार 13 मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात 66.75 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात 60.21 टक्के मतदान झाले. या 13 मतदारसंघांतील जवळपास चार मतदारसंघांत 60 आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण मतदारसंघात 50.12 टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 50.6 टक्के मतदान झाले.

मतदानाची आकडेवारी

भिवंडी – 59.89 टक्के
धुळे – 60.21 टक्के
दिंडोरी – 66.75 टक्के
कल्याण – 50.12 टक्के
उत्तर मुंबई – 57.02 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 51.98 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 56.37 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 54.84 टक्के
दक्षिण मुंबई – 50.06 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 53.60 टक्के
नाशिक – 60.75 टक्के
पालघर – 63.91 टक्के
ठाणे – 52.09 टक्के

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भायखळा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 52.72 टक्के मतदान झाले. भायखळा मतदारसंघात मुस्लिम वस्त्यांमधून हुकूमशाहीविरुद्ध मतदानाला उदंड प्रतिसाद लाभला. शिवडी, वरळी, मलबार हिल आणि मुंबादेवी या मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारीही 50 टक्क्यांपेक्षा जास्त राहिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;