IPL 2024 : कोलकाता चौथ्यांदा अंतिम फेरीत दाखल, हैदराबादचा केला 8 विकेटने पराभव
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने (KKR) हैदराबदचा (SRH) 8 विकेटने पराभव करत धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. हैदराबादने दिलेल्या लक्षाचा पाठलाग कोलकाताच्या फलंदाजांनी 14 व्या षटकात पूर्ण करत सामना आपल्या खिशात घातला.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात यशस्वी ठरले. पूर्ण आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असणाऱ्या ट्रेविस हेडचा (0) शानदार त्रिफळा स्टार्कने उडवला. हेडच्या जोडीला आलेला अभिषेक शर्माला (4 चेंडू 3 धावा) वैभव अरोराने स्वस्तात माघारी पाठवले. राहूल त्रिपाठी (35 चेंडू 55 धावा), क्लासेन (21 चेंडू 32 धावा) आणि कर्णधार कंमिन्स (24 चेंडू 30 धावा) यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे हैदराबदाचा संघा 159 या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. कोलकाताकडून स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर वैभव अरोरा, हर्षित राणा, नारायण आणि रस्सल यांनी प्रत्येकी एक विकेट तर, चक्रवर्तीला दोन विकेट घेण्यात यश आले.
160 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या सलामीच्या जोडीने कोलकाताचा चांगली सुरूवात करून दिली. गुरबाज (14 चेंडू 23 धावा), सुनील नारायण (16 चेंडू 21 धावा), वेकंटेश अय्यर (28 चेंडू 51 धावा) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूंमध्ये ठोकलेल्या 58 धावांच्या मदतीने कोलकाताने 14 व्या षटकात 160 धावांचा यशस्वी पाठलाग करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हैदराबादकडून कमिंन्स आणि नटराजण यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List