SSC Result 2024 : दहावीचा निकाल कधी लागणार? शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज (21 मे 2024) जाहीर झाला. बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला असून यंदाही मुलींना बाजी मारली आहे. तर प्रशासकिय विभागांमध्ये कोकण विभागाने पुन्हा अव्वल ठरला. बारावीचा निकाल लागल्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये रंगत आहे. आता या संदर्भात आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी माहिती दिली आहे.
बारावीचा निकाल लागल्यामुळे आता दाहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 27 मे पूर्वी लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दाहावीच्या निकाला संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. दहावीचा निकाल 27 मे 2024 च्या आधी लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दहावीच्या निकालाची तारीख पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List