Pune Porsche Accident : विशाल अगरवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune Porsche Accident : विशाल अगरवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यात मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडणाऱ्या आरोपी बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच बिल्डर पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

अंबादास दानवे यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे. ‘पुण्यातील अपघातप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली. याशिवाय ही गाडी वितरित करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा’, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुलांना दारू उपलब्ध करून देणाऱ्या पब्जवर करावाई करण्याची मागणी मी आज केली आहे. जर कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे’, असे अंबादास दानवे पुढे म्हणाले.

कसा झाला होता अपघात?

बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने पुण्यात शनिवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास मित्रांसोबत हॉटेलमध्ये मद्यपान पार्टी केली. यानंतर आलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्याने जागीचा मृत्यू झाला. कारने फरफटत नेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बिल्डर विशाल अगरवाल यांना अटक केली आहे. तसेच पब मालकालाही अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;