कतरिना प्रेग्नेंट नाही, प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर पीआर टीमने केलं स्पष्ट
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलीवूडच्या मोस्ट फेव्हरेट कपल्सपैकी एक आहेत. तसेच ही जोडी चाहत्यांचीही लाडकी आहे. विकी आणि कतरिना सोशल मीडियावरही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विकीही कतरिनाची खूप काळजी घेतो. या कारणास्तव सर्वजण त्याला सर्वोत्तम पती देखील म्हणतात. लाँग विकेंडसाठी हे दोघेही लंडनमध्ये गेले आहेत. विकी-कतरिनाचा लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा कतरिना प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान कतरिनाच्या पीआर टिमने याबाबत आता मोठी माहिती दिली आहे. कतरिना प्रेग्नेंट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक चाहते निराश झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना लंडनच्या रस्त्यावर हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. विकी पत्नी कतरिनाची काळजी घेत आहे. व्हिडिओमध्ये कतरिनाने मोठ्या आकाराचे कपडे घातले आहेत. तसचे ती मोठ्या कपड्यांमध्ये बेबी बंप लपवताना दिसत आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये कतरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विकी आणि कतरिनाचा लंडनमधील व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिलेय की, कतरिना गर्भवती आहे का? असा सवाल अनेक युजर्सने त्यांना विचारला आहे. तर काहींनी प्लिज त्यांना प्राव्हसी द्या. त्यांनाही याची गरज असेत. असे म्हटले आहे. काहींनी कतरिनाला व्हिडीओमध्ये टॅग करून तिचे अभिनंदनही केले आहे. मात्र नंतर कतरिनाच्या पीआर टीम कडून सत्य समजल्यावर चाहते नाराज झाले आहेत.
नुकताच विक्की कौशलने त्याचा 36 वा वाढदिवस सादरा केला. विकीच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने विकीचे अनेक फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तो हसताना दिसत होता. ते फोटो बर्थडे डिनरचे वाटत होते. फोटो शेअर करताना कतरिनाने केक आणि हार्ट इमोजी पोस्ट केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List