मलाही टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायचंय!; गौतम गंभीर, रिकी पाँटिंगनंतर आता ‘हा’ खेळाडूही स्पर्धेत

मलाही टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायचंय!; गौतम गंभीर, रिकी पाँटिंगनंतर आता ‘हा’ खेळाडूही स्पर्धेत

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अनेक देशी विदेशी खेळाडूंनी आपली इच्छा दर्शवली आहे. राहुल द्रविडने पुन्हा प्रशिक्षक होण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक कोण असणार? यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आम आदमी पार्टीचा खासदार हरभजन सिंगने प्रशिक्षक होण्याची इच्छा दर्शवली आहे.

T20 World Cup 2024 झाल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे BCCI ने प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी रिकी पॉटिंग, गौतम गंभीर आणि स्टीफन फ्लेमिंग यांची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र आता टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

“मी अर्ज करेन का नाही मला माहित नाही. टीम इंडियाला प्रशिक्षित करणे म्हणजे एक प्रकारे मॅनेजमेंट करणे आहे. ना की खेळाडूंना ड्राइव्ह आणि पुल कसा मारायचा हे शिकवणे. ते त्यांना चांगले माहित आहे. तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन करू शकता. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि मला जर ते परत देण्याची संधी मिळाली तर मला नक्कीच अधिक आनंद होईल,” असे हरभजन सिंगने ANI शी बोलताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;