Cannes 2024 – कियाराचा मेट गालाच्या रेड कार्पेटवर किलर लूक; चाहते घायाळ

Cannes 2024 – कियाराचा मेट गालाच्या रेड कार्पेटवर किलर लूक; चाहते घायाळ

फ्रान्समध्ये सुरू झालेल्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला आता पर्यंत अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. याच यादित आता कियारा अडवाणीचेही नाव समोर आले आहे. कियारा अडवाणीचे कान्स 2024 चे लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. या इव्हेंटमध्ये कियारा अनेक स्टायलिश आउटफिट्समध्ये दिसली. जे पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. या इव्हेंटसाठी तिने एक सुंदर आणि स्टाईलिस्ट पोशाख परिधान केला. गुलाबी आणि काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसतेय. तिने स्ट्रॅपलेस पिंक टॉपसह फिश कट लाँग स्कर्ट घातला होता. सोबत हातात लांब जाळीचे हातमोजे घातले.कियाराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ड्रेससोबत गळ्यात डायमंड स्नेक स्टाईल ज्वेलरी उंच घट्ट केसांचा बन आणि सटल मेकअप केला आहे. कियाराचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;