आपण फक्त नावं बदलून श्रद्धांजली लिहायची..! मराठी लेखकाने व्यक्त केला उद्वेग

आपण फक्त नावं बदलून श्रद्धांजली लिहायची..! मराठी लेखकाने व्यक्त केला उद्वेग

पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यप्राशन करून एका अल्पवयीन मुलाने भरधाव गाडीने दोन जणांना उडवलं. या भीषण अपघातात या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा असल्याचं निष्पन्न झालं असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी मुलाविरुद्ध अपघात तसंच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. पण, तरीही या घटनेचे संतप्त पडसाद उमटताना दिसत आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धन यांनी या घटनेवर अतिशय उद्वेगपूर्ण पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात की, ‘मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!,’ असं क्षितीज म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;