महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज; रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज; रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला आहे. कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझननी मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली.आता त्याच सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या “बिग बॅास मराठी” च्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आता आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या आलिशान घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप्स अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;