ट्वीटरपेक्षा इन्स्टाग्राम चांगलं… ; महेंद्र सिंग धोनीचं वक्तव्य चर्चेत
महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) IPL 2024 मधला प्रवास संपुष्टात आला आहे. असे असले तरी चेन्नई सुपर किंग्जचा विशेषता महेंद्र सिंग धोनीचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे धोनीच्या हालचालींवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. अशातच धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीने Instagram हे X (ट्वीटर) पेक्षा चांगले असल्याचे म्हटल आहे.
महेंद्र सिंग धोनीने 2020 साली इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. अशातच धोनीने दुबईमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये आपल्या आवडत्या सोशल मीडिया माध्यमाबद्दल मत व्यक्त केले. “मला ट्वीटरपेक्षा इन्स्टाग्राम जास्त आवडते. मला नाही वाटत की ट्वीटरवर काही चांगल्या गोष्टी घडतील. तिथे फक्त वाद होतात. त्यावर कोणीतरी काही लिहेल आणि त्याचे रुपांतर वादात होईल. असे असताना मी ते का वापरू? तुम्हाला माहित असेल की ट्वीटरवर पहिलं 140 शब्दांची शब्द मर्यादा होती. त्यापेक्षा जास्त तुम्ही लिहू शकत नाही. विचार करा की मी तिथे काही तरी लिहीन आणि त्यानंतर लोक त्यांच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढतील. त्यामुळे ते माझ्यासाठी नाही,” असे महेंद्र सिंग धोनीने म्हटले.
IPL 2024 : महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्ती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर
“इन्स्टाग्राम मला आवडते कारण तुम्ही त्यावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करू शकता. त्यामध्ये देखील बदल होत आहेत. मी इन्स्टाग्रामला प्राधान्य देतो मात्र मी त्यावर अॅक्टिव नाही, कारण जेवढ्या मन भरकवटवणाऱ्या गोष्टी कमी असतील तेवढे चांगले, ” असे म्हणत धोनीने इन्स्टाग्राम हे त्याचे आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List