Photo – पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाने राज्यात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सलग तेरा वर्षे अव्वल क्रमांक आबाधित ठेवला आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाचे सेलिब्रेशन केले.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List