राजधानी दिल्लीतील जनता पाकिस्तानी आहे काय? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहांवर निशाणा

राजधानी दिल्लीतील जनता पाकिस्तानी आहे काय? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहांवर निशाणा

राजधानी दिल्लीसह देशभरात भाजपला इंडिया आघाडीकडून जबरदस्त आव्हान मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत भाजप आणि आपमधील संघर्ष वाढला आहे. नवी दिल्लीत अमित शहा यांची एक सभा होती. त्या सभेला 500 पेक्षा कमी लोक आले होते. त्यामुळे शहा यांचा पारा चढला आणि त्यांनी दिल्लीतील नागरिकांना दोष देण्यास सुरुवात केली. तसेच आपचे समर्थक पाकिस्तानी आहेत, असे वक्तव्यही त्यांनी केले. अमित शहा यांच्या या वक्तव्यावर केजरीवाल यांनी पलटवार केला असून राजधानी दिल्लीतील जनता पाकिस्तानी आहे का? असा सवाल करत केजरीवाल यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

केजरीवाल यांनी शहा यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, दिल्लीतील जनतेने 56 टक्के मतदान करून आम्हाला 62 जागा दिल्या. पंजाबच्या जनतेने आम्हाला 117 पैकी 92 जागा दिल्या. आम्हाला प्रेम करणारी जनता पाकिस्तानी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी अमिश शहा यांना उत्तराधिकारी म्हणून कदाचित नेमले असेल. मात्र, येत्या 4 जूनला भाजपच्या सरकारची गच्छंती निश्चित आहे, असेही केजरीवाल म्हणाले. देशात आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे शत्रूत्व आपल्याशी आहे. ते आपल्यावर आरोप करतात, आपल्याला शिव्या देतात, ते आपण सहन केले. मात्र, भाजप किंवा त्यांच्या नेत्यांनी दिल्लीतील आणि देशातील जनतेला शिव्या दिल्या, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी भाजपला दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;