वर्धा नगरपंचायतीचा अजब कारभार; स्मशानभूमीला बनविले चक्क कचरा डेपो
>> चेतन वाघमारे
वर्धा जिल्यातील समुद्रपुर तालुक्यात नगर पंचायतीचा आगळावेगळा अजबच प्रकार उघड झाला आहे. येथे स्मशानभूमीलाच चक्क कचरा डेपो बनविण्यात आले आहे. याआधी समुद्रपूर गावाची जीवनदायिनी असणाऱ्या वाघाडी नदीला कचरा डेपोचे स्वरूप देण्यात आले होते. समुद्रपूर येथील जागरूक नागरिक व वाघाडी फाउंडेशनच्या तरुण मंडळांनी केलेल्या विरोधामुळे स्मशानभूमीपासून 3000 फूट अंतरावर असलेल्या वनविभागाच्या जागेवर कचरा डेपो निर्माण करण्यात आला होता. त्या ठिकाणी गावातील सर्व घरातील ओला व सुका कचरा गोळा करण्यात येत होता.
या कचरा डेपोतील कचऱ्याचे नियोजन करण्यात नगरपंचायतीला अपयशी आले. त्यामुळे आता नगर पंचायतीचा हायटेक आगळा वेगळा प्रताप समोर आला आहे. सध्याच्या स्थितीत या कचरा डेपोमुळे पूर्ण स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्मशानभूमीलाच चक्क कचरा डेपो करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असेल. स्मशानभूमीत पसरलेला हा ओला आणि सुका कचरा आता पावसाने भिजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
कचरा डेपोसाठी जागा विकत घेण्याकरिता ठराव मंजूर झाला असून त्यासाठी पैसे आले आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर जमीन घेऊन कचरा डेपो उभारून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
– महादेव बादले, गट नेता
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List