चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या सिंदेवाही शाखेला लागली आग
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही शहरातील शाखेच्या इमारतीला आग लागल्याचे निर्दशनात येताच खळबळ उडाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे म्हटले जात आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे व अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविवण्यास यश आले.
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही शहरातील शाखेच्या इमारतीला आग लागली या घटनेची माहिती सिंदेवाही पोलीस विभागाला व अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यास यश आले, या आगीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक वस्तू जळून खाक झाले आहे. घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List