बारावीच्या परीक्षेत सलग तेराव्यांदा कोकण बोर्ड राज्यात अव्वल, कोकण बोर्डाचा निकाल 97.51 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्डाने सलग तेराव्यांदा राज्यात बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा बारावीचा निकाल 97.51 टक्के लागला आहे. कोकण बोर्डातून 25 हजार 793 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 25 हजार 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण बोर्डातील रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 97.07 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.33 टक्के लागला आहे.
कोकणातल्या मुलींनीही राज्यात बाजी मारली आहे. कोकण बोर्डातील मुलींचा निकाल 98.60 टक्के लागला आहे. 12 हजार 943 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 12 हजार 763 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर झाला. कोकण बोर्डाने राज्यात निकालांत प्रथम क्रमांक पटकावला. कोकण बोर्डात 12 हजार 850 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 12 हजार 390 मुले उत्तीर्ण झाली. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.42 टक्के आहे. कोकण बोर्डात 12 हजार 943 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 12 हजार 763 मली उत्तीर्ण झाल्या. मलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.60 टक्के आहे. कोकण बोर्डाचा निकाल 97.51 टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 97.07 टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्यातून 16 हजार 721 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 16 हजार 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुलींचा निकाल 99.08 टक्के
रत्नागिरी जिल्ह्यातून 8 हजार 272 मुलगे परीक्षेला बसले. त्यापैकी 7 हजार 922 मुलगे उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.76 टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 8 हजार 449 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 8 हजार 310 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.35 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.33 टक्के लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 9 हजार 072 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 8 हजार 921 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 हजार 578 मुलगे परीक्षेला बसले. त्यापैकी 4 हजार 468 मुलगे उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 हजार 494 मुलीं परीक्षेला बसल्या. त्यापैकी 4 हजार 453 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.08 टक्के आहे.
शाखानिहाय निकाल
कोकण बोर्डात विज्ञान शाखेतून 9 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 9 हजार 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के लागला आहे. कला शाखेतून 5 हजार 632 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 5 हजार 281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 93.76 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून 9 हजार 522 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 9 हजार 376 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 98.46 टक्के लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 865 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 836 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिकचा निकाल विज्ञान 96.64 टक्के लागला आहे. टेक्निकल सायन्समधून 296 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टेक्निकल सायन्सचा निकाल 96.24 टक्के लागला आहे.
गतवर्षीपेक्षा निकालात दीड टक्क्याने वाढ
कोकण बोर्डाने सलग तेराव्यांदा राज्यात अव्वल क्रमांक राखला आहे पण त्याबरोबरच गतवर्षीपेक्षा निकालात दीड टक्क्याने वाढ झाली आहे. मार्च 2023चा निकाल 96.01 टक्के होता. यंदा बारावीचा निकाल 97.51 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 2.18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे 96.42 टक्के आणि मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.60 टक्के आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List