बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी; राज्याचा निकाल 93.37 टक्के

बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी; राज्याचा निकाल 93.37 टक्के

यंदाचा बारावीचा संपूर्ण राज्याचा 93.37 टक्के निकाल लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 टक्के लागला असून मुलांचा निकाल 91.60 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेतला होती. बोर्डाने मंगळवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला.

विभागनिहाय निकाल

पुणे- 94.44, नागपूर 92.12, छत्रपती संभाजीनगर 94.08, मुंबई 91.95, कोल्हापूर 94.24, अमरावती 93.00, नाशिक 94.71, लातूर 92.36, कोकण 97.51

निकालाची ठळक वैशिष्टये

  • या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 टक्के आहे.
  • या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,448 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 45,083 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 49.82 आहे.
  • खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.
  • या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6986 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 टक्के आहे.
  • बारावी परीक्षेला नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
  • सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;