लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 92.36 टक्के, लातूर जिल्ह्यातील मुलीच अव्वल

लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 92.36 टक्के, लातूर जिल्ह्यातील मुलीच अव्वल

>> अभय मिरजकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 92.36 टक्के लागला आहे. राज्यातील 9 विभागीय परीक्षा मंडळाच्या निकालात लातूर जिल्हा सातव्या क्रमांकावर आला आहे. 91 हजार 528 विद्यार्थ्यांनी लातूर विभागातून परीक्षा दिली होती. त्यातील 84 हजार 541 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागातील 50 हजार 369 मुलांपैकी 45 हजार 313 मुले उत्तीर्ण झाले आहेत तर 41 हजार 159 मुलींपैकी 39 हजार 228 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 89.96 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.30 टक्के आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या लातूर विभागीय मंडळाच्या वतीने विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी निकालासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लातूर विभागातून 92 हजार 932 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 91 हजार 528 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 84 हजार 541 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागीय मंडळाच्या निकालाची टक्केवारी 92.36 टक्के एवढी आहे. महाराष्ट्रात लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल 7 व्या क्रमांकावर आहे. लातूर विभागातून 50 हजार 369 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 45 हजार 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 89.96 टक्के राहिले तर 41 हजार 159 मुलींनी परीक्षा दिली. त्यातील 41 हजार 228 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.30 टक्के राहिले.

लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.81 टक्के लागला आहे. 50 हजार 665 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामधील 50 हजार 325 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 49 हजार 224 विद्यार्थी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा कला शाखेचा निकाल 84.10 टक्के लागला. 30 हजार 143 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 29 हजार 334 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 24 हजार 671 विद्यार्थी कला शाखेतून उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा वाणिज्य शाखेचा निकाल 92.31 टक्के लागला आहे. 8 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 280 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 7 हजार 644 विद्यार्थी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाले.

लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 83.49 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विभागात 3 हजार 319 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 3 हजार 151 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 2 हजार 631 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्या आयटीआय चा निकाल 84.70 टक्के लागला आहे. 440 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 438 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 371 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळातील उत्तीर्ण झालेल्या 84 हजार 541 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 169 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 13.29 टक्के आहे. 35 हजार 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 38.29 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत लातूर विभागातून 31 हजार 509 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर उत्तीर्ण श्रेणीत 5 हजार 808 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण श्रेणीमध्ये केवळ 6 टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

लातूर विभागात सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा

लातूर विभागीय परीक्षा मंडळामध्ये लातूर, धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.39 टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 89.78 टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.74 टक्के लागला आहे.

लातूर जिल्ह्यातील 37 हजार 459 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 36 हजार 904 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 34 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धाराशिव जिल्ह्यातील 16 हजार 663 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 16 हजार 336 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 14 हजार 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्यातील 42 हजार 464 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 41 हजार 871 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 37 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लातूर जिल्ह्यातील 5 हजार 297 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 15 हजार 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीमध्ये 12 हजार 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये 2 हजार 90 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 34 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील 1 हजार 843 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 6 हजार 102 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5 हजार 910 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर केवळ 837 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असून, धाराशिव जिल्ह्यातील एकूण 14 हजार 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 144 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. 14 हजार 622 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 14 हजार 207 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 3 हजार 605 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील 37 हजार 578 विद्यार्थी उत्त्ीर्ण झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 86.61 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.53 टक्के आहे. धाराशिव जिल्ह्यातील मुलांच्या उत्तीर्णचे प्रमाण 86.76 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.51 टक्के आहे. लातूर जिल्ह्यातील मुलांच्या उत्तीर्णतेचे 91.46 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.85 टक्के आहे.

लातूर विभागीय परीक्षा मंडळामध्ये इंग्रजी विषयाचा निकाल 92.92 टक्के लागला आहे. मराठी विषयाचा निकाल 96.42 टक्के तर हिंदी विषयाचा निकाल 96.97 टक्के लागला आहे. संस्कृत भाषेचा निकाल 99.75 टक्के लागला आहे. लातूर विभागात 29 प्रकरणे कॉपीची उघडकीस आलेली होती. या सर्व 29 जणांवर मंडळाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली असून, त्या विषयाची त्यांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे – लातूर 92.88 टक्के, अहमदपूर 95.61 टक्के, औसा 95.89 टक्के, चाकूर 95.79 टक्के, देवणी 94.58 टक्के, जळकोट 94.63 टक्के, निलंगा 95.78 टक्के, रेणापूर 93.91 टक्के, शिरूर अनंतपाळ 94.97 टक्के, उदगीर 94.78 टक्के.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;