“हेलनशी लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी..”; सलीम खान काय म्हणाले?

“हेलनशी लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी..”; सलीम खान काय म्हणाले?

अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र हेलन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय काही ‘तडकाफडकी’ नव्हता, असं सलीम खान सांगतात. हेलन यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं, हे त्यांनी आधी कुटुंबीयांना सांगितलं होतं. पहिली पत्नी सलमा आणि चारही मुलांना याबद्दलची माहिती होती. सलीम आणि सलमा यांनी 1964 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. एका मुलाखतीत सलीम खान हे त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

“माझ्या विवाहित आयुष्यात भ्रमनिरास झाला म्हणून किंवा मी त्रस्त होतो म्हणून हेलनशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला न्वहता. हेलनशी लग्न करण्याचा निर्णय काही तडकाफडकी घेण्यात आला नव्हता. मी खूप वेळ घेतला होता. माझ्या आयुष्यात हेलन आहे, हे सलमाला सांगणारी पहिली व्यक्ती मीच होतो. दुसऱ्या कोणाकडून किंवा गॉसिप मॅगझिनमधून समजण्याआधीच मी तिला सत्य सांगितलं होतं”, असं सलीम खान म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

हेलन यांच्या नात्याबद्दल सांगितल्यानंतर मुलांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “त्यावेळी मुलं लहान होती, त्यामुळे त्यांच्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता. मुलं नेहमीच आईच्या बाजूने असतात आणि संपूर्ण परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्याचं श्रेय मी सलमाला देतो. जेव्हा मी तिला हेलनविषयी सांगितलं, तेव्हा अर्थातच तिने माझं कौतुक केलं नाही. साहजिकच आमच्यात काही वाद झाले, पण ते काही वेळापुरतेच होते. ठराविक वेळेनंतर सर्व गोष्टी स्वीकारल्या गेल्या. माझ्या मुलांना मी त्यावेळी सांगितलं होतं की, कदाचित ही गोष्ट तुम्हाला आता समजणार नाही, पण मोठं झाल्यावर तुम्ही मला समजू शकाल. लग्नानंतरही मी त्यांना हेच स्पष्ट केलं की, हेलनला तुम्ही तुमच्या आईइतकंच प्रेम करावं अशी माझी अपेक्षा नाही. पण तिला तुम्ही तितकाच आदर द्या.”

आजही सलीम खान, सलमा, हेलन आणि अभिनेता सलमान खान हे मुंबईतील वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये एकत्र राहतात. सलीम आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. तिने आयुष शर्माशी लग्न केलं असून आयुषसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतोय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;