धक्कादायक….भंडारा जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा; पुरवठा कंपनीवर कारवाईची मागणी

धक्कादायक….भंडारा जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा; पुरवठा कंपनीवर कारवाईची मागणी

>> सूरज बागडे 

भंडारा जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभाग अंगडवाडीतील चिमुकल्या जिवांशी खेळत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा करण्यात आला आहे. ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येताच याची लगेच माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमांतून महिला बालविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. या पोषण आहाराची मुदत एका महिन्याआधीच संपली असताना अंगणवाडी केंद्रात याचा पुरवठा कसा करण्यात आला. ही बाब लक्षात आली नसती तर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे असा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हा प्रकार लक्षात येताच महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. आणखी किती अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा केला गेला याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल शासनाला पाठवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;