Pune Porsche accident : मुलाच्या वडिलांना संभाजीनगरातून अटक, पब मालकही गजाआड

Pune Porsche accident : मुलाच्या वडिलांना संभाजीनगरातून अटक, पब मालकही गजाआड

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अगरवाल याने शनिवारी मद्यपान करून बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होताच अगरवाल फरार झाले होते.मात्र पोलिसांनी तपास वेगाने करत संभाजीनगर येथून विशाल अगरवाल यांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पब मालक आणि मॅनेजरलाही अटक केली आहे.

अपघातानंतर विशाल अगरवाल फरार झाले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नारळीबाग परिसरातील जेपी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये अगरवाल यांनी तीन खोल्या बुक केल्या होत्या. त्याते चालक चतुर्भुज डोलस आणि अगरवाल यांचे मित्र राकेश पौडवाल आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते तर अगरवालने रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये थांबले होते. तिथेच ते लपून बसल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली.स्थानिक पोलिसांनी तिथे छापा टाकला असता चालक चतुर्भुज डोलस आणि अगरवाल यांचे मित्र राकेश पौडवाल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अगरवाल दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संभाजीनगर येथून त्यांना अटक केली.

वेदांत अल्पवयीन असून त्याला पबमध्ये प्रवेश दिल्याबद्दल आणि त्याला व त्याच्या मित्रांना दारू पाजल्याबद्दल या अपघाताप्रकरणी मुंढव्यातील मॅरियट स्वीट्स आणि कोझी हॉटेलचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर यांच्यासह ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक संदीप सांगळे आणि बार काउंटरचे कर्मचारी जयेश बोनकर यांना गुन्हे शाखेने अटक केली असून, तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत या घटनेशी संबंधित दोन एफआयआर नोंदवले आहेत. या अपघाताचा तपास खडकीचे सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुसऱ्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;