भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त, वादग्रस्त वक्तव्यानंतर आता संबित पात्रा यांची माफी
ओडिशा येथे पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत असे वक्तव्य केल्याने आता मोठा वादंग निर्माण झालेला आहे. मात्र सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर पात्रा यांनी आता सारवासारव करत असे विधान आपल्याकडून अनावधानाने झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान जगन्नाथ यांचे परमभक्त असल्याचे आता म्हंटले आहे. तसेच आपल्या आधीच्या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे.
ओडिया वृत्तवाहिनीला घेतलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संबित पात्रा यांनी केलेल्या विधानावरुन सोमवारी ओडिशाचे मुख्यंमंत्री नवीन पटनायक यांनी टीका केली आहे. महाप्रभू श्री जगन्नाथ हे साऱ्या विश्वाचे भगवान आहे, अशा प्रभूंना एका व्यक्तीचा भक्त म्हणणे ईश्वराचा अपमान आहे. या विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यामुळे संबित पात्रा यांनी केले विधान निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर संबित पात्रा यांनी आता माफी मागितली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List