सेलिब्रेटींनी बजावले मतदानाचे कर्तव्य
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘आम्ही कर्तव्य बजावलं, तुम्ही मतदान करा,’ असे म्हणत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सेलिब्रेटींनी केले. रोजच्या कामातून, शूटींगच्या गडबडीतून वेळ काढत अनेकजण सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले. कोणताही बडेजाव न करता, सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान करताना दिसले. अनेक सेलिब्रेटींनी मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, अमिताभ बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, आदी ज्येष्ठ कलावंतांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रेम चोप्रा, राकेश रोशन, डेविड धवन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, रणवीर सिंह, फरहान अख्तर, झोया अख्तर, शाहीद कपूर, राजकुमार राव, बोनी कपूर, अनिल कपूर, हृतिक रोशन, संजय दत्त, आर्यन खान, गुलशन ग्रोव्हर, गायक शंकर महादेवन, अशा अनेक सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क पार पाडला.
मराठी कलाकारांचा उत्साह
मुंबईत मतदानात मराठी कलाकारांनीही भरभरून मतदान केले. मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून जनजागृती केली. अशोक सराफ, प्रशांत दामले, श्रेयस तळपदे, स्वप्निल जोशी, सुकन्या मोने, शुभा खोटे, सुनील बर्वे, स्पृहा जोशी, श्वेता मेंहेदळे, विशाखा मोरे, पृथ्वीक प्रताप, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधील कलाकार समीर चौगुले, गौरव मोरे, प्रथमेश परब यांच्यासह अनेकांनी मतदान केले. यावेळी कलाकारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन चाहत्यांना केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List