मतदानासाठी मुंबईकरांच्या रांगा
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबई या सहा मतदारसंघात मतदान पार पडले. मुंबईकरांनी मतदान करण्यासाठी मतदान पेंद्राबाहेर भल्यामोठय़ा रांगा लावल्या होत्या.
बूथवरील कार्यकर्ते घामाघूम
मुंबईतील अनेक भागांत आज सकाळपासून भयंकर उकाडा होता. उन्हाच्या तीव्र झळा सोसत विविध पक्षांचे कार्यकर्ते बुथवर ठाण मांडून बसले होते. कार्यकर्त्यांची धावाधाव आणि मतदारांना बूथवर आणण्याच्या आव्हानामुळे उन्हात फिरावे लागत होते. त्यामुळे बूथवढ़रील कार्यकर्ते घामाघूम झाल्याचे पाहायला मिळत होते. या उष्णतेमुळे अनेक कार्यकर्त्यांची शर्टही घामाने ओली झाली होती.
बँकांचे शटर डाऊन
आज मुंबईत मतदान पार पडत असल्याने बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मतदारसंघातील विविध ठिकाणी बँकांचे शटर डाऊन करण्यात आले होते. बँकाचे शटर डाऊन असले तरी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम मात्र उघडे ठेवण्यात आले होते.
वाईन शॉपपुढे कार्यकर्त्याचे बूथ
वाईन शॉप पुढे दारूसाठी तळीरामांच्या रांगा लागलेले चित्र आज कुठेच दिसले नाही. आज वाईन शॉपपुढे चक्क कार्यकर्त्यांनी बूथचे टेबल लावले होते. या शॉप पुढे मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी तळीरामांऐवजी मतदार राजाच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यकर्तेही तितक्याच तत्परतेने मतदारांना त्यांचे नाव शोधून देत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List