गजानन किर्तीकरांच्या पत्नीचा मोठा दावा…वाचा नेमके काय म्हणाल्या…

गजानन किर्तीकरांच्या पत्नीचा मोठा दावा…वाचा नेमके काय म्हणाल्या…

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर मतदान झाले. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल किर्तीकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. मात्र, अमोल किर्तीकर यांचा पारडे जड आहे. तसेच वायकर यांनी आपण दबावाखाली शिंदे गटात गेल्याची कबूली दिल्याने मतदारांची त्यांच्यावर नाराजी आहे. त्यातच शिंदे गटात गेलेले गजानन किर्तीकर यांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांनी मोठा दावा केला आहे.

या मतदारसंघात माझा मुलगा अमोल किर्तीकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे, असा दावा मेघना किर्तीकर यांनी केला आहे. तसेच आपले पती गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेले, हे आपल्याला पटले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. एकनाथ शिंदे हे वयाने आणि अनुभवाने किर्तीकर यांच्यापेक्षा लहान आहेत. अशा व्यक्तीसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणे, आपल्याला पटलेले नाही. यासाठी आपण त्यांना विरोधही केला होता. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यांना जे पटले तो निर्णय त्यांनी घेतला आहे, असेही मेघना किर्तीकर म्हणाल्या. सोमवारी मतदान केल्यानंतर त्या झी 24 तासशी त्या बोलत होत्या.

या मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने जनतेत नाराजी आहे. मी अमोललाच मत दिले आहे. ते या मतदारसंघातून निश्चितच मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;