अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघा नराधमांना तुरुंगवासाची शिक्षा
दहा वर्षांपूर्वी तानसा जलवाहिनीजवळ 16 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमाला 4 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दुसऱया घटनेत 10 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱया वॉचमनला 3 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. विशेष पोक्सो न्यायाधीश प्रिया बनकर यांनी दोन्ही नराधमांना पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
24 सप्टेंबर 2014 रोजी 16 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. पीडित मुलगी आईला घरकामात मदत करण्यासाठी तिच्यासोबत गेली होती. याचदरम्यान आरोपी संतोष पाटेकरने तिला जबरदस्तीने खेचले आणि रिक्षातून तानसा पाईपलाईनजवळ पळवून नेले. तिथे एका झोपडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पाटेकरला दुसऱयाच दिवशी अटक केली होती. विशेष सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी पाटेकरच्या कृत्याबद्दल ठोस पुरावे आणि साक्षीदार सादर केले. त्याचप्रमाणे एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱया मुकेश चौधरीचे दोषत्व सिद्ध केले. न्यायालयाने संतोष पाटेकरला 4 वर्षांची सक्तमजुरी, तर मुकेश चौधरीला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याव्यतिरिक्त दोन्ही नराधमांना दंडही ठोठावला आहे.
असहाय्य स्त्राrच्या आत्म्यावर आघात
अत्याचार करणारे नराधम केवळ पीडितेच्या वैयक्तिक सचोटीवर गदा आणत नाही, तर असहाय्य स्त्राrच्या आत्म्यावर आघात करतो. अशा प्रकारचा गुन्हा केवळ पीडितेविरुद्ध नसून तो संपूर्ण समाजाविरुद्ध आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List