कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली; निवडणूक अधिकारी, पोलिसांना शिवीगाळ

कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली; निवडणूक अधिकारी, पोलिसांना शिवीगाळ

भिवंडी शहरात ठिकठिकाणी उत्साहात मतदान सुरू होते. खंडूपाडा, बाला कंपाऊंड, मिल्लतनगर येथील मतदान केंद्रांवर भाजपचे उमेदवार कपिल पाटील गेले तेव्हा त्यांना मुस्लिम समाजाच्या मतदारांची गर्दी दिसली. ही गर्दी पाहून कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी मतदान केंद्रांवर इतकी गर्दी कशाला? यांना हाकलून द्या असे सांगत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना चक्क शिवीगाळ केली. त्यामुळे या मतदान केंद्रांवर काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर कपिल पाटील हे इदगाह येथील केंद्रावर गेले. तेथेही मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लोटली होती. तेथेही कपिल पाटील यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केली तेव्हा मतदारांच्या संतापाचा भडका उडाला आणि त्यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. मतदारांचा रुद्रावतार पाहून कपिल पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला.

कपिल पाटलांचा तोल ढासळला
कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांचा तोल ढासळला आहे. मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना बाहेर हाकला, असे सांगणाऱ्या कपिल पाटलांविरोधात मतदारांमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. त्यानंतर संयम सुटलेल्या पाटील यांनी पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांवर जाऊन शिवीगाळ केली. हे निंदनीय आहे. कपिल पाटलांचा मी तीव्र निषेध करतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;