मेट्रोमधून दिवसभरात 1 लाख 13 हजार प्रवाशांचा प्रवास
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत आज पार पडले. नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने मूळ तिकीट दरावर 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम म्हणजे, सोमवारी एकाच दिवसात मुंबई मेट्रो 2 अ आणि 7 मधून तब्बल 1 लाख 13 हजार 414 प्रवाशांनी प्रवास केला. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून तिकीट दरात सवलत देण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List