मीरारोड, ठाण्यात बोगस मतदान

मीरारोड, ठाण्यात बोगस मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ठाण्यात अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ठाण्यातील चरई, पाचपाखाडी, वागळे, मीरारोड येथील नयानगर, मीरागावठाण येथे बोगस व्होटिंग करून आमचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. वागळे येथे तर एका पुरुष मतदाराच्या नावावर स्त्री मतदाराने बोगस व्होटिंग केले.

ठाण्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी अनेक ठिकाणी रांगा लागल्या, परंतु दुपारी मतदानासाठी उतरलेल्या मतदारांना मात्र धक्का बसला. कारण त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले होते. भरत बेवा (38) हा मतदार चरईतील सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रावर गेला असता तुमच्या नावावर आधीच मतदान झाले आहे असे तेथील अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर बेवा यांना धक्का बसला. दुसरा धक्कादायक प्रकार वागळे येथे घडला. सालवीन नाडार हा तरुण मतदान करण्यासाठी वागळे येथील मतदान केंद्रावर गेला असता तुमच्या नावावर एका महिलेने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले, तेव्हा सालवीन नाडार हे भिरभिरले. मीरारोडच्या नयानगर भागात राहणाऱ्या शहनाज बानो शेख (64) या मतदान केंद्रावर गेल्या असता त्यांच्या नावावर आधीच बोगस मतदान केल्याचे उघड झाले. मीरारोड येथील शांतीनगरमधील फरीदा सय्यद यांच्या नावावरही बोगस मतदान करण्यात आले. तर मीरागावठाण येथील शहजाद अन्सारी (32) हे ३९७ क्रमांकाच्या केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावापुढेही बोगस व्होटिंग झाल्याचे उघड झाले.

बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणले ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार व ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला. कोपरी, पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट या भागात या लोकांना आणून ठेवण्यात आल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;