नाशिकमध्ये 61, दिंडोरीत अंदाजे 63 टक्के मतदान

नाशिकमध्ये 61, दिंडोरीत अंदाजे 63 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी नाशिक मतदारसंघात अंदाजे 61 टक्के, तर दिंडोरीत अंदाजे 65 टक्के मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त केले. रणरणत्या उन्हामुळे दुपारी एकनंतर मतदानाचा मंदावलेला वेग चारनंतर पुन्हा वाढला. दिंडोरी मतदारसंघात दोन ठिकाणी शेतकऱयांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून पेंद्राविरोधातील रोष व्यक्त केला. जिह्यात मतदार याद्यांमध्ये नाव न सापडल्याने काही मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला.

नाशिक मतदारसंघासाठी 1910, दिंडोरी मतदारसंघाकरीता 1922 पेंद्रांवर आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिले दोन तास हा वेग काहीसा मंदावलेला होता. सकाळी सात ते नऊ यावेळेत नाशिकमध्ये 6.45, तर दिंडोरीत 6.30 टक्केच मतदान झाले. अकरापर्यंत ही टक्केवारी अनुक्रमे 16.3 आणि 19.5, एकपर्यंत 28.5 आणि 33.25 वर पोहोचली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे नाशिकमध्ये मतदानाचा वेग मंदावला. मात्र, दुपारीदेखील ग्रामीण भागात उत्साह कायम होता. त्यामुळे नाशिक 39.41 व दिंडोरी 45.95 टक्के इतकी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी होती. चारनंतर मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याने मतदान पेंद्रांवर रांगा होत्या. पाचपर्यंत नाशिक 61 आणि दिंडोरीत अंदाजे 68 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

धुळय़ात यंदा सरासरी 52 टक्के मतदान!

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात यंदा सरासरी 52 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत 56 टक्के मतदान झाले होते. मतदानाअंती निवडणूक लढवणाऱया अठरा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मात्र मुख्य लढत ही काँग्रेसच्या शोभा बच्छाव आणि भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान पेंद्रावर पोहोचणाऱया प्रत्येकाचे मतदान करून घेण्यात आले.

 

कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान पेंद्रांवर वडगाव, नैताळेत पेंद्र सरकारचा निषेध

पेंद्र सरकारने कांदा निर्यातीचे शेतकरीविरोधी धोरण राबवले, यामुळे जिह्यातील शेतकरी देशोधडीला लागले. हा रोष आज मतदानाच्या दिवशी दिंडोरी मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये दिसून आला. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील तरूण शेतकरी सोमवारी कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी निघाले. निर्यातबंदी लादणाऱयांना पुन्हा संधी देणार नाही, असा त्यांनी ठाम निर्धार केला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;