धारावीत कष्टकरी वर्ग आणि महिलांचा मतदानात हिरिरीने सहभाग

धारावीत कष्टकरी वर्ग आणि महिलांचा मतदानात हिरिरीने सहभाग

दक्षिण मध्य मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघ म्हणजे कष्टकऱयांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील हातावर पोट असलेल्यांपासून तळागाळातील महिलांनी आज अत्यंत हिरिरीने मतदानामध्ये सहभाग घेतला. यामध्ये खास करून मुस्लिम महिलांची संख्या लक्षणीय होती. धारावी पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेला सत्ताधाऱयांच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी धारावीकर जणू मतदानासाठी बाहेर पडले होते असे चित्र दिसत होते.

धारावीतील 60 हजारांहून अधिक झोपडय़ा आहेत. यामध्ये 10 लाखांहून अधिक लोक राहतात. 13 हजारांहून अधिक लघुउद्योग धारावीत आहेत. पुंभारवाडय़ातील व्यवसाय, कापड उद्योग, चामडय़ाचा उद्योग, शिवणकामाशी संबंधित व्यवसाय, भंगार, प्लॅस्टिक वस्तू, सजावटीचे सामान, खाद्यपदार्थांचे मोठे उद्योग, बेकरी अशा असंख्य उद्योगांमध्ये काम करणारा कष्टकरी वर्ग आहे.

मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय

 

धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून सत्ताधाऱयांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. जणू हा रोष मतदानातून व्यक्त करण्यासाठी धारावीकर मोठय़ा संख्येने बाहेर पडलेले दिसत होते. धारावीतील 90 फूट  रोड, 60 फूट रोड, पुंभारवाडा, कोळीवाडा, टी जंक्शन अशा भागात मोठय़ा संख्येने मतदार रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. यामध्ये मुस्लिम मतदार आणि मुस्लिम महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसत होती. हातावर पोट असलेले अनेक कामगार मतदानासाठी आले होते. धारावीत अनेक लोक रोजंदारीवर काम करतात. एक दिवसाची रोजंदारी बुडवून मतदानासाठी आले होते. धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून धारावीकरांमध्ये अस्वस्थता आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली आपल्याला धारावीच्या बाहेर काढतील अशी या कष्टकरी वर्गाला भीती आहे. सत्ताधारी निवडून आले तर आपल्याला धारावी सोडून जावे लागेल अशी अनेकांमध्ये भीती आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी धारावीतील मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडलेले दिसत होते. आता मतदान केले नाही तर पुढील पाच वर्षे आम्हाला पश्चाताप व्यक्त करावा लागेल अशी चर्चा मतदारांमध्ये होती. त्यामुळे धारावीकरांच्या रोषाचा मोठा फटका महायुतीला बसणार अशी चिन्हे दिसत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;