लैंगिक अत्याचार पीडितेचा प्रसूती खर्च करा; हायकोर्टाचे ठाणे सिटी हॉस्पिटलला आदेश
लैंगिक अत्याचार पीडितेच्या प्रसूतीचा खर्च करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे सिटी हॉस्पिटलला दिले. पीडितेने गर्भपातासाठी याचिका केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पीडितेने गर्भपाताचा निर्णय बदलला.
न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे आदेश दिले. पीडिता सध्या ठाणे येथील इस्पितळात आहे. तिला प्रसूतीपर्यंत चेंबूर येथील कस्तुरबा महिला वसतिगृहात ठेवावे. तेथील संपूर्ण खर्च राज्य शासनाने करावा, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. बाळ जन्माला आल्यानंतर आवश्यक असल्यास त्याला उपचार द्या, असेही न्यायालयाने रुग्णालयाला सांगितले आहे. यावरील पुढील सुनावणी 1 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List