आरटीईच्या एक लाख जागांसाठी 92 हजार अर्ज; पुण्यासह नागपूर, नाशिक, नांदेड, अमरावतीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

आरटीईच्या एक लाख जागांसाठी 92 हजार अर्ज; पुण्यासह नागपूर, नाशिक, नांदेड, अमरावतीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के कोटय़ांतर्गत आरटीई प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत आरटीईच्या 1 लाख 4 हजार 525 जागांसाठी 92 हजार 805 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 31 मेपर्यंत आरटीई प्रवेशाचा अर्ज करण्यासाठी मुदत असून येत्या 10 दिवसांत अर्जांचा एक लाखाचा टप्पा पार पडेल, असे चित्र आहे.

पुण्यासह नागपूर, नाशिक, नांदेड आणि अमरावतीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, तर सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिह्यातून आले असून येथील आरटीईच्या 293 जागांसाठी 35 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. राज्यातील 9 हजार 136 शाळांमधील 1 लाख 4 हजार 525 जागांसाठी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या महिन्यात राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेचा विचार करता सध्या इंग्रजी मध्यमाच्या शाळांमधील  जागांसाठी नव्याने राबवल्या जात असलेल्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत प्रवेश अर्जाने 92 हजारांचा टप्पा पूर्ण केला असून यात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student. maharashtra.gov.in/admÀortal या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. पालकांना येत्या 31 मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

 

आरटीई प्रवेश अर्जांची स्थिती

जिल्हा      प्रवेश क्षमता प्रवेश अर्ज

पुणे                     17,591   20,208

नागपूर                   6920      8352

नाशिक                   5268      5429

ठाणे                    11,356      7555

अमरावती               2369      2679

छत्रपती संभाजीनगर 4441      5553

मुंबई                      5670      2892

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;