शुक्रवारपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश

शुक्रवारपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश

मुंबई महानगरक्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकेतील अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी शुक्रवारी, 24 मेपासून सुरुवात होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱया, दोन विशेष फेऱया होणार आहेत. तर त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनंदिन गुणवत्ता फेरी घेतली जाणार आहे. तर प्रत्येक फेरीसोबत कोटांतर्गत प्रवेश समांतर पद्धतीने सुरू राहणार आहे.

अकरावीचे हे प्रवेश यंदा पेंद्रीय प्रवेश फेऱयांच्या माध्यमातून केले जातील. व्यवस्थापन, अल्पसंख्यांक आणि इनहाऊस कोटय़ातील प्रवेश महाविद्यालयांना संपर्क साधून केले जाणार आहेत. कोटय़ातील जागा रिक्त राहिल्यास त्या पेंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित केल्या जातील. कोटय़ातील प्रवेश हे संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून गुणवत्तेनुसार देण्यात येतील.

 

22 मेपासून सराव

प्रक्रियेसाठी 22 ते 23 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सरावा करण्यासाठी  https://11thadmission. org.in/ पोर्टलवर डमी लॉगीन आणि त्यावर यासाठीच्या सुविधा दिल्या जातील. मात्र प्रत्यक्ष अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया ही 24 मे पासूनच सुरू होणार असून दहावीच्या निकालानंतर दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 

मुंबई क्षेत्रातील अकरावीची स्थिती

मुंबई महापालिका क्षेत्रात 2 हजार 385 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी 3 लाख 89 हजार 675 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 2 लाख 67 हजार 862 जागांवर म्हणजेच केवळ 69 टक्के प्रवेश झाले तर उर्वरित 1 लाख 21 हजार 813 जागा रिक्त राहिल्या होत्या. तर तब्बल 242 महाविद्यालयांध्ये एकही प्रवेश झाला नव्हता. 320 महाविद्यालयांध्ये 20 टक्के तर 443 मध्ये 50 टक्के आणि 306 महाविद्यालयांध्ये 100 टक्के प्रवेश झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;